
राज्यातील आपत्ती निवारण कार्याचा सर्वंकष आढावा घेऊन आगामीमॉन्सूनच्या पार्वभूमीवर सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश आजमंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्य आपत्तीव्यवस्थापनाच्या बैठकीत दिले.
मॉन्सून कालखंडातील संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वांनीसज्ज रहावे असे आवाहन याप्रसंगी केले. रस्तेदुरुस्ती, नालेसफाई हीकामे प्राधान्याने पूर्ण करावीत, रेल्वेचे अंतर्गत येणारेनाले कल्र्टहेदेखील स्वच्छ करावे. दरवर्षी पाणी भरते अशी गावे वेळीच रिकामीकरावी, ज्यांचा संपर्क दरवर्षी तुटतो अशा गावातील नागरिकांनाआधीच धान्याचा पुखवठा करावा. यादीत नसलेल्या गावांचा दरडकोसळण्याचा धोका ओळखून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळीहलवावे. धोकादायक इमारतींच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवावे,मोठ्या शहरातील धोकादायक नाल्यांना संरक्षक जाळ्या बसवाव्यालिस्टमध्ये नसलेल्या इमारतीहीं धोकादायक नाहीत ना याची पाहणीकरावी, धरणप्रवण क्षेत्रात पाणी सोडले जाणार असल्यास वेळीचत्याची माहिती रहिवाशांना द्यावी. धबधबे आणि निमुळत्या कड्यांवरसुट्टीच्या निमित्ताने जाणाच्या पर्यटकांना वेळीच मज्जाव करावा असेयावेळी सूचित केले. सगळे तत्पर आणि एकमेकांच्या संपर्कातराहिल्यास कितीही मोठी आपत्ती आली, तरीही तिला तोंड देणे शक्यहोईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.यावेळी सैन्यदल, नौदल, हवाई दलाचे अधिकारी, कोस्ट गार्ड, मुंबईमनपा आयुक्त, राज्यातील सर्व मनपांचे आयुक्त, जिल्हाधिकारीएमएमआरडीए, महाडा, एसआरए, मुंबई पोलीस, जेएनपीटी, बीपीटी,आयुक्त, राज्य प्रशासनातील सर्व विभागांचे प्रधान सचिव आणि इतरसंबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते